#CAA : भारतातील सध्याची परिस्थिती गंभीर – मायक्रोसॉफ्ट सीईओ

नवी दिल्ली – सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर आंदोलने चालू आहेत. अशातच भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही सीएएवर आपले मत मांडले आहे.

सत्या नडेला म्हणाले कि, भारतात जे काही होत आहे. ते खूपच दुःखद आहे. भारतातील सध्याची परिस्थिती गंभीर आहे. भारतात एका स्थलांतरित बांगलादेशी व्यक्तीला टेक कंपनी अथवा इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी होताना मला पाहायला आवडेल, असे त्यांनी सांगितले आहे. बझफीडचे संपादक बेन स्मिथ यांच्याशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले.

भारत आणि युरोपसाठी इमिग्रेशन हा एक मोठा मुद्दा आहे. तेथील सरकारने आणि नागरिकांनी याबद्दल विचार करावा, असेही त्यांनी म्हंटले आहे. सत्या नडेला पुढे म्हणाले कि, स्थलांतर म्हणजे काय? स्थलांतरित कोण आणि अल्पसंख्याक गट कोण? ही संवेदनशीलता आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे भारतात लोकशाही आहे. जिथे लोक त्यावर चर्चा करत आहेत. यावर गंभीर चर्चा व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

भारत हा असा देश हवा जिथे बाहेरच्या व्यक्ती येऊन एखादी कंपनी सुरु करेल आणि तिची भरभराट होईल किंवा बाहेरुन आलेल्या व्यक्तीने सुरु केलेल्या कंपनीचा देशाला आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल अशी माझी इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, भारताने ११ डिसेंबर २०१९ रोजी सुधारित नागरिकत्व कायदा संमत करु घेतला. त्यानंतर अधिसुचना काढून हा कायदा देशभरात लागू करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.