दिल्ली : पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील पक्ष मुख्यालयात भारतीय जनता पक्षाची बैठक सुरू आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल हि बैठक होत आहे.
या बैठकीत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोषही उपस्थित आहेत.विरोधकांना ‘बेजबाबदार’ आणि ‘बालिश’ असे संबोधून भाजपने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची बद्दल कॉंग्रेस अल्पसंख्यांकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे.
Delhi: Bharatiya Janata Party meeting chaired by party president Amit Shah underway at party headquarters. BJP working president JP Nadda & national general secretary (organisation) B L Santosh, also present at the meeting. pic.twitter.com/17bjSkNVfA
— ANI (@ANI) January 1, 2020
कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी सांगितले की, संसदेत पारित केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे राज्य सरकारांचे “घटनात्मक कर्तव्य” आहे.
प्रसाद म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी होणार नाही असे म्हणणाऱ्या राज्यांनी निर्णय घेण्यापूर्वी योग्य कायदेशीर सल्ला घ्यावा. संसदेने केलेले कायदे राबविणे हे राज्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे,” असे प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.