पुणे – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात
घेतल्या जाणाऱ्या सीए परीक्षेचे प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
“आयसीएआय’ने जुलै महिन्यात होणाऱ्या सीए फाऊंडेशन, इंटरमिजिएट व फायनल या तिन्ही परीक्षा करोनामुळे थेट नोव्हेंबर महिन्यात होतील, असे यापूर्वीच स्पष्ट केले होते.
या परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार होत्या. मात्र, करोना प्रादुर्भाव व बिहार विधानसभा निवडणुकीमुळे पुन्हा तारखा पुढे ढकलण्यात आल्या.
अखेर ही परीक्षा 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. त्यासाठीचे प्रवेशपत्र रविवारपासून “आयसीएआय’ने उपलब्ध करून दिले आहे.