‘सीए’ परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर

19,20 नोव्हेंबरला होणार परीक्षा

पुणे – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या पुढे ढकललेल्या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता या परीक्षा 19 आणि 20 नोव्हेंबरला होणार आहेत.

“आयसीएआय’ने सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर गुरुवारी प्रसिद्ध केले. या परीक्षा नियोजित वेळापत्रकनुसार पूर्वी 9 आणि 11 नोव्हेंबरला घेतल्या जाणार होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आल्याने सुरक्षिततेचा भाग म्हणून देशभरातील विविध भागांतील शाळा-महाविद्यालये बंद ठेवली होती. त्या पार्श्‍वभूमीवर “आयसीएआय’कडून या दरम्यानच्या “सीए’ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

“आयसीएआय’ने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, फाउंडेशन, जुन्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेच्या गट दोनमधील पेपर 5, नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेच्या गट दोनमधील पेपर 5, विमा आणि जोखीम व्यवस्थापन (इन्शुरन्स ऍन्ड रिस्क मॅनेजमेंट), अंतर्गत करप्रणाली (इंटर्नल टॅक्‍सेशन) या विषयांची परीक्षा 19 नोव्हेंबर, तर इंटरमिजिएट जुना अभ्यासक्रम आणि इंटरमिजिएट नव्या अभ्यासक्रमाची परीक्षा 20 नोव्हेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती “आयसीएआय’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.