चंदीगड – पंजाबचे माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसचे बंडखोर नेते कॅ. अमरिंदरसिंग यांनी आज हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. खट्टर यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
गेले काही दिवस अमरिंदरसिंग यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. त्याच अनुषंगाने ही भेट झाल्याचे मानले जात आहे. आजच संसदेत तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेणारे विधेयक संमत झाले आहे. त्यासाठी अमरिंदरसिंग विशेष आग्रही होते.
त्या संबंधातही यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यांच्यापैकी कोणीही या चर्चेविषयी अधिक माहिती दिलेली नाही. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अमरिंदरसिंग म्हणाले की, ही केवळ सदिच्छा भेट होती. सन 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अमरिंदरसिंग हे खट्टर यांना भेटल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.