नवी दिल्ली – अवघ्या काही महिन्यांवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीची सर्वच पक्षांना धास्ती असून त्यातच आता आलेला नवीन सर्वे सर्वांना धडकी भरवणारा आहे. हा सर्वे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमोर आव्हान उभा करणारा आहे.
उत्तर प्रदेशातील जनतेचा कौल सातत्याने बदलताना दिसत आहे. यावरून मुख्यमंत्रीपदावरून अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे सत्ता कोणाला मिळणार हे सांगण कठिण आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशात घेतलेल्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीची पसंती कोणाला हेही विचारण्यात आलं. या सर्व्हेनुसार मुख्यमंत्रीपदासाठी योगींना अधिक पाठिंबा मिळत असल्याचं समजत. मुख्यमंत्री पदासाठी योगीच उत्तम असं सर्व्हेत सहभागी झालेल्या नागरिकांना वाटत. अखिलेश यादव यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
सर्व्हेनुसार 44 टक्के लोकांची मुख्यमंत्रीपदासाठी योगी आदित्यनाथ यांना पसंती आहे. तसेच 31 टक्के लोकांनी अखिलेश यादव यांना कल दिला आहे. तर उर्वरित 15 टक्के लोकांना मुख्यमंत्री म्हणून मायावती यांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.