Bypoll Results 2019 : ‘जिंद’मध्ये भाजप, तर रामगडमध्ये काँग्रेसच्या बाजूने कौल

हरियाणा येथील जिंद तर राजस्थान येथील रामगड विधानसभेच्या जागांसाठी घेण्यात आलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. हरियाणातील जिंद येथे भाजपचे उमेदवार कृष्ण मिढ्ढा यांनी जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) दिग्विजय चौटाला आणि काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांचा पराभव केला. मिढ्ढा यांना ५०५६६ तर चौटाला यांना ३७६३१ आणि काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांना २२७४० मते मिळाली.

दुसरीकडे राजस्थानातील रामगड विधानसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवार साफिया जुबेर खान यांनी भाजपाचे उमेदवार सुवंत सिंग यांचा १२२२८ मतांनी पराभव केला आहे. साफिया जुबेर खान यांना ८३३११ तर सुवंत सिंग यांना ७१०८३ मते मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)