माजी कसोटीपटू बेदी यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया

नवी दिल्ली  – भारतीय संघाचे माजी कर्णधार व महान फिरकी गोलंदाज तसेच माजी कसोटी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांच्यावर मंगळवारी येथील एका रुग्णालयात बायपास शस्त्रक्रीया करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना ह्रदयविकाराचा त्रास जाणवत होता. त्यांची ऍन्जिओग्राफी करण्यात आली होती व त्यांना बायपास शस्त्रक्रीया करण्यास सांगण्यात आले होते. येथील सीटी रुग्णालयात 74 वर्षांच्या बेदी यांच्यावर बायपास शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर अशल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले आहे. ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून लवकरच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल व त्यांना घरी सोडण्यात येइल असेही त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

बेदी आपल्या वादग्रस्त विधानांनी सातत्याने चर्चेत असतात. गेल्या वर्षी डीसेंबरमध्ये त्यांनी दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला होता. खेळाडूंच्या जागी संघटनेचे माजी अध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत अरुण जेटली यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची नावे फिरोज शाह कोटला क्रिकेट मैदानातील स्टॅण्डला दिली जात असल्यच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिला होता. तसेच त्यावेळी त्यांनी संघटनेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला होता. बेदी यांनी आपल्या सुवर्ण कारकिर्दीत 1967 ते 1979 या कालावधीत भारताकडून 67 कसोटी सामने खेळताना 266 बळी घेतले होते. भारतीय फिरकी गोलंदाजीच्या सुवर्णक्षणांचे ते साक्षिदार आहेत.
———-

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.