वाई पालिकेच्या एका जागेसाठी 29 डिसेंबरला पोटनिवडणूक

वाई – वाई नगरपालिकेच्या प्रभाग आठ “अ’ मधील अनुसूचित जमातीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी 29 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. नगरसेवक विकास पांडुरंग काटेकर यांचे 12 ऑक्‍टोबरला निधन झाल्याने प्रभाग आठ “अ’ मधील नगरसेवक पद रिक्‍त झाले आहे.

त्यामुळे राज्यनिवडणूक आयोगाने रिक्‍त पदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वाई पालिकेतील प्रभाग आठ “अ’ मधील अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या रिक्‍त पदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी 4 ते 12 डिसेंबरपर्यंत सुट्टीचा दिवस वगळता सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे.

13 डिसेंबरला दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी 18 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे. 29 डिसेंबर सकाळी 7.30 ते 5.30 पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. 30 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहिर करण्यात येणार आहे. या प्रभागात एकूण 3232 मतदार असून, त्यासाठी पालिका शाळा क्र. 10, बालवाडी वर्ग व प्रार्थना हॉल व नॅशनल पब्लिक स्कूल इयत्ता दुसरी वर्ग सेंटथॉमस स्कूल अशा चार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रांतधिकारी संगीता राजापुरकर या निवडणूक निर्णय अधिकारी विद्यादेवी पोळ या काम पाहत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.