चिंबळीत दोन रिक्‍तजागेसाठी पोटनिवडणूक

चिंबळी- येथील प्रभाग एक व प्रभाग दोनमधील रिक्‍त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रभाग एकमधील माजी उपसरपंच हेमंत जैद यांचे पद रद्द झाल्याने व प्रभाग दोनमध्ये माजी उपसरपंच पांडुरंग बटवाल यांचे निधन झाल्याने या रिक्‍त झालेल्या जागी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

प्रभाग एक सर्वसाधारण पुरुष तर प्रभाग दोन ओबीसी पुरुषासाठी आरक्षित आहे. उमेदवारी अर्ज शनिवारी (दि. 16) ते गुरुवार (दि. 21) पर्यंत मुदत आहे. छाननी शुक्रवारी (दि.22) तर माघार आणि चिन्हवाटप सोमवारी (दि. 25) आहे. मतदान रविवारी (दि. 8 डिसेंबर) होणार असून, मतमोजणी सोमवारी (दि. 9 डिसेंबर) राजगुरूनगर येथे होणार आहे, अशी माहिती गावकामगार तलाठी बी. बी. पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.