शतप्रतिशत वाणी

शतप्रतिशत हा शब्द भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात सातत्याने वापरला होता. भाजप सर्वच्या सर्व जागांवर विजयी झाल्या पाहिजेत असा संदेश देण्यासाठी भाजपाने “शतप्रतिशत भाजप’ अशी टॅगलाईन किंवा घोषणा प्रसिद्ध केली होती. त्यामुळे शीर्षक वाचून तुम्हाला वाणी कपूर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे की काय असे वाटू शकते; पण तसे नाहीये.

वाणी कपूरने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की ती चित्रपटक्षेत्रातील कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच कोणत्याही अभिनयासाठी शंभर टक्‍के योगदान देण्याचा प्रयत्न करते. 2013 मध्ये “शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून वाणीने आपल्या सिनेकरिअरची सुरुवात केली. 2016 मध्ये”बेफ्रिके’ आणि यंदाच्या वर्षी आलेल्या “वॉर’मध्ये तिने दमदार अभिनय केला.

आता वाणी रणबीर कपूरसोबत “शमशेरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. जीवन ज्याप्रकारे पुढे जात आहे, त्यावर मी खूप समाधानी असल्याचं वाणी सांगते. ती म्हणत, टीकाकार काय म्हणतात किंवा प्रशंसक काय म्हणतात यावर विसंबून न राहता माझ्या हातात जितकं आहे तितकं सारं मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)