शतकाच्या अखेरीपर्यंत 30 टक्के स्थानिक भाषा होणार नष्ट

अनेक औषधी वनस्पतींची माहिती ही नष्ट होण्याचा धोका

झुरीच – या शतकाच्या अखेरीपर्यंत जगात विविध देशांमध्ये बोलल्या जाणाऱ्या 30 टक्के स्थानिक भाषा नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे या भाषांची संबंधित औषधी वनस्पतींचे ज्ञानही नष्ट होण्याचा धोका समोर आला आहे.

झुरिच विद्यापीठाने केलेल्या संशोधनात हा महत्त्वाचा निष्कर्ष काढण्यात आला आहे या संशोधनासाठी संशोधकांच्या टीमने भाषा आणि जैविक विविधता यांच्यातील संबंधाचा शोध घेण्यासाठी उत्तर अमेरिका उत्तर पश्चिम ॲमेझॉन आणि न्यू गिनी येथील 230 स्थानिक भाषांचा आणि भाषांसंदर्भात 12000 औषधी वनस्पतींचा अभ्यास केला.

तेव्हा अनेक महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले उतयर अमेरिकेतील 73 टक्के औषधी वनस्पतींचे ज्ञान एक केवळ एका भाषेपुरते मर्यादित राहिली असून उत्तर-पश्चिम ॲमेझॉनमध्ये 91 टक्के आणि न्यू गिनी मध्ये 94 टक्के ज्ञान फक्त एका भाषे पुरतेच मर्यादित राहिले आहे.

संशोधनाच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉक्टर रोड्रीगो यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ह्या जर भाषा नष्ट झाल्या तर या औषधींची माहिती देणारे पारंपारिक ज्ञानही समाप्त होणार आहे. स्थानिक भाषांमध्ये संबंधित औषधी वनस्पती आणि इतर पर्यावरणाबाबत शब्दांचा वापर केला जातो.

आणि त्या वनस्पतींना किंवा झाडांना कोणत्या नावाने ओळखले जाते याबाबत माहिती असते औषधी वनस्पतींचा उपयोग काय याबाबतही ज्ञान स्थानिक भाषांत या माध्यमातूनच मिळत असते. दुसरीकडे युनायटेड नेशनच्या संशोधनाप्रमाणे जगात बोलल्या जाणाऱ्या एकूण सात हजार चारशे भाषांपैकी 30 टक्के पेक्षा जास्त भाषा या शतकाच्या अखेरीपर्यंत नष्ट होण्याचा धोका आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये जगातील एक हजार 900 पेक्षा जास्त भाषा आशा आहेत ज्यामध्ये ही भाषा बोलणारे 10,000 पेक्षा कमी लोक आहेत. युनायटेड नेशन सह जगातील इतर सर्व महत्त्वाच्या संस्थांनी या भाषा वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर या भाषांची संबंधित सर्व ज्ञानही नष्ट होण्याचा धोका समोर आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.