मंचर- घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे महावितरण कंपनीच्या वतीने डीपी आणि पोल बसविण्यात आला असल्यामुळे सालोबामळा, भवानीमाळ, काळे कॉम्पलेक्स, काळे कॉलनी येथील नळपाणी समस्येचा प्रश्न मार्गी लागला आहे, अशी माहिती सरपंच क्रांती गाढवे यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी पुणे जिल्हा डी. पी. टी. सी.अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी 24 तास लाईटची सेवा, डीपी व पोल बसविणे या कामांसाठी 7 लाख रुपये निधी मंजूर केले होते. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले आणि विद्युत डीपी आणि विजेचे खांब उभारल्याने संबधित वाड्यावस्त्यांवर वेळेत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे, असे सरपंच क्रांती गाढवे यांनी सांगितले. उपसरपंच सोमनाथ काळे, ग्रामपंचात सदस्य गणेश घोडेकर, अक्षय नंदकर, गणेश वाघमारे, मजीद मुजावर, ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाईकडे, प्रशांत गाढवे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि वीज वितरण कंपनी घोडेगावचे कर्मचारी उपस्थित होते.