मुंबई – पोलिसांना चार फेब्रुवारीला मढ आयर्लंडवर एका बंगल्यात पॉर्न चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याचा फोन आला होता. पोलिसांनी तातडीने धाड टाकली. नको त्या अवस्थेत चित्रीकरण करणाऱ्या दोघांना त्यावेळी पकडण्यात आले.
या चित्रीकरणासाठी मदत करणाऱ्या पाच जणांना त्यावेळी अटक करण्यात आली आणि एका महिलेची सुटका करण्यात आली. त्या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि त्याचा शेवट उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा यांना 19 जुलै अटक करण्यात झाला.
दरम्यान, राज कुंद्रा यांच्या वकिलाने कुंद्रा यांना ज्या अश्लील चित्रपटांच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारामध्ये मोडत असल्याचा युक्तीवाद केलाय. तर या संपूर्ण प्रकरणात आता पर्यंत अनेक नव नवे खुलासे झाले आहे.
यातच हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,राज कुंद्रानं दीड वर्षांमध्ये १०० पेक्षा अधिक पॉर्न मुव्हीजची निर्मिती केली होती. तसंच याच्या माध्यमातून त्यानं कोट्यवधी रूपयांचीही कमाई केली होती.
हे चित्रपट ज्या अॅपवर अपलोड केले जातात त्यांच्याकडे २० लाखांच्या जवळ सबस्क्रायबर्स आहेत. दरम्यान, वेबसाईट पेक्षा अॅपचा वापर करणं सोपं असल्यानं अॅप तयार करण्यात आल्याचं क्राईम ब्रान्चचं म्हणणं आहे. याशिवाय वेब साईट बंदही करण्यात येते, परंतु अॅपबाबत तसं होत नाही.
दरम्यान, कुंद्रा यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सोमवारी मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज कुंद्रा यांनी पोंडा यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. पोंडा म्हणाले, ‘आपण निर्माण केलेल्या कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. हा कंटेट अश्लील प्रकारामध्ये मोडतो असा युक्तीवाद कुंद्रांच्या वकिलांनी केलाय.’