मुंबई – जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. सुरेश वाडकरांनी मराठीसह भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी ,उर्दू भाषेत गाणी गायली आहेत.
दरम्यान, हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुरेश वाडकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी वाडकर म्हणाले कि, “देशातील इतका मोठा पुरस्कार मिळाल्याचा मला मोठा आनंद झाला आहे. मला पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने लता दिदींचीच कित्येक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण केली”.
तसेच पुढे बोलताना वाडकर म्हणाले की, ‘सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या नावाचा पद्म पुरस्कारासाठी विचार व्हावा, यासाठी दीदी गेली २० वर्ष न चुकता केंद्र सरकारला पत्र लिहीत होत्या, असं सुद्धा ते यावेळी म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुरेश वाडकर बोलत होते.
सुरेश वाडकर यांचा जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५५ रोजी कोल्हापूर येथील चिखली गावी झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. त्यांची और इस दिल में क्या रखा है, ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था, मेघा रे मेघा रे, सीने में जलन आखों में तुफाँ सा क्यु हैं, सुरमयी अखियों में, ऐ जिंदगी गले लगा ले, चप्पा चप्पा चरखा चले असे अनेक सुप्रसीध्द गाणी गायली आहेत.