बारागावनांदूरची 23 जूनला पोटनिवडणूक

नगर  – राहुरी तालुक्‍यातील बारागाव नांदूर या जिल्हा परिषदेच्या गटाबरोबरच नेवासा पंचायत समितीच्या सोनई व कर्जत पंचायत समितीच्या कोरेगाव गणाची पोटनिवडणूक 23 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी 3 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

राहुरी तालुक्‍यातील बारागांव नांदूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे शिवाजीराव गाडे विजयी झाले होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे या रिक्‍त जागेसह सोनई व कोरेगाव या दोन पंचायत समिती गणांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 23 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची नोटीस 3 जून रोजी प्रसिध्द होणार आहे.

या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी संकेतस्थळावर भरण्यात आलेले उमेदवारी अर्ज 3 जूनपासूनच दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 8 जूनपर्यंत आहे. 10 जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज नामंजूर झाल्यास जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्यासाठी 17 जूनर्यंत मुदत आहे. ज्या अर्जांवर अपिल नाही, तेथे 15 जूनपर्यंत तर जेथे अपील आहे तेथे 19 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी 15 जून रोजी प्रसिध्द होणार आहे. आवश्‍यकता वाटल्यास 23 जून रोजी मतदान होणार आहे. 24 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)