लोकसभेच्या 3, विधानसभेच्या 30 जागांची पोटनिवडणूक जाहीर

नवी दिल्ली  – देशातील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 30 जागांसाठीच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. या निवडणुका 30 ऑक्‍टोबरला होणार आहेत. या मतदार संघातील मतमोजणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

निवडणूक आयोगाने करोनाची स्थिती, पुरस्थिती, सण व उत्सवांचा कालावधी तसेच हवामानाच्या स्थितीचा अंदाज घेऊन पोटनिवडणुकांची 30 ऑक्‍टोबरची तारीख निश्‍चीत केली आहे अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली.

ज्या तीन लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुका होत आहेत त्या मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि दादरा-नगर हवेली या तीन राज्यांमध्ये होतील. विधानसभांच्या पोटनिवडणुकांच्या 30 जागाही विविध राज्यांमधील आहेत त्यात पश्‍चिम बंगाल मधील काही मतदार संघांचाहीं समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.