2047पर्यंत देशात फक्त भाजपचीच सत्ता राहणार – राम माधव

आगरताळा – भाजप  सत्तेत येणारा व जास्तीत जास्त बहुमत मिळवणारा मोठा पक्ष ठरला आहे. भाजप नेतृत्वाचा ठसा राजकीय पातळीवर उमटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला 30 मे पासून सुरुवात झाली. मोदी यांनी 58 मंत्र्यांचे सरकार स्थापन करून कामाला प्रारंभ केला आहे.


दरम्याना, भाजपाचे महासचिव राम माधव शुक्रवारी त्रिपुरामध्ये म्हणाले,’जर कोणता पक्ष सर्वाधिक काळ सत्तेत राहिला असेल तर तो काँग्रेस आहे. काँग्रेसनं 1950 ते 1977पर्यंत देशात सत्ता गाजवली. मी तुम्हाला विश्वासानं सांगू शकतो की, मोदी हा रेकॉर्ड तोडतील. 2047ला स्वातंत्र्याचं 100वे वर्षं भारत साजरा करेल, तोपर्यंत देशात भाजपाची सत्ता राहील, असंही राम माधव म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत आगरताळा, त्रिपुरातल्या दोन्ही जागा भाजपानं जिंकल्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.