#BWFWorldTour : पी.व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात

ग्वाँझू : सलग दुस-या पराभवामुळे गतविजेत्या पी.व्ही. सिंधूचे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेत ‘अ’ गटातील दुस-या लढतीत सिंधूचा चीनच्या चेन यु फेइने पराभव केला.

गुरूवारी झालेल्या दुस-या लढतीत चीनच्या चेन यु फेइने पी.व्ही. सिंधूचे आव्हान २०-२२,२१-१६,२१-१२ असं परतवून लावले. स्पर्धेतील तिचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

आता शुक्रवारी सिंधूची लढत हे बिंग जिओविरूध्द होईल पण दुस-या लढतीत अकाने यामागुचीने बिंग जिओ हे हिच्यावर विजय मिळवल्याने सिंधूचे आव्हान संपुष्टात आले. ‘अ’ गटातून चेन यु फेइ आणि यामागुचीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, स्पर्धेत बुधवारी गटातील पहिल्याच लढतीत तिला जापानच्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्कारावा लागला होता. ‘अ’ गटात एकेरीच्या पहिल्या लढतीत जापानच्या अकाने यामागुचीने सिंधूचे आव्हान १८-२१, २१-१८, २१-८ असे परतवून लावत विजय मिळवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.