Detelची इलेक्ट्रिक दुचाकी मिळणार फक्त 39,999 रुपयात, एकदा चार्ज केल्यास 60Km धावते; जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली – देशातील ईव्ही स्टार्टअप कंपनी डेटेलने शुक्रवारी आपली इजी प्लस इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणली आहे. कंपनीने या दुचाकीची किंमत 39,999 ठेवली आहे. Easy Plus इलेक्ट्रिक टू-व्हीलर तुमच्यासाठी चार कलरमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Red, Yellow, Teal Blue आणि Royal Blue कलरचा समावेश आहे. त्याचबरोबर कंपनीने या टू-व्हीलरचे बुकींगसुद्धा सुरु केले आहे.

Easy Plus इलेक्ट्रिक टू-व्हीलर बैटरी पॅक
डेटेल कंपनीने आपल्या इलेक्ट्रीक टू-व्हीलर मध्ये 20AH ची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. ही बॅटरी फुल्ल चार्ज करण्यासाठी 4 ते 5 तासाचा कालावधी लागतो. त्याचबरोबर एकदा चार्ज केल्यानंतर ही टू-व्हीलर 60 किलोमीटरचे अतर पूर्ण करु शकते.

Easy Plus इलेक्ट्रिक टू-व्हीलर कशी मिळवणार
गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या 2021 इंडिया ऑटो शोमध्ये डेटेलने प्रथमच इलेक्ट्रिक स्कूटर इझी प्लस सादर केली. त्याचबरोबर कंपनी हे टियर -2 आणि टियर-3 शहरांमध्येच हे इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे. आपण ही इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन बुक करू शकतो.

2017 मध्ये सुरु केली डेटेल कंपनी
डेटेल कंपनीने इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅझेटसह 2017 मध्ये सुरुवात केली. कंपनीने 2020 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विभागात प्रवेश केला. त्याचबरोबर प्रदूषण व पर्यावरणाचे रक्षण करणारी वाहने तयार करण्याचा कंपनीचा नेहमीच प्रयत्न केला आहे. यामुळे कंपनीने इझी प्लस इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.