Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

हमीभावानेच शेतीमाल खरेदी करा, अन्यथा कारवाई

by प्रभात वृत्तसेवा
September 14, 2019 | 12:02 pm
A A

पाथर्डी  – पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे वृत्त दैनिक “प्रभात’ मध्ये प्रसिद्ध होताच बाजार समिती प्रशासन खडबडून जागे झाले. व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा आशयाच्या नोटिसा बाजार समितीने व्यापाऱ्यांना बजावल्या आहेत.

बाजार समितीचा कारभार पारदर्शक करण्यासाठी संचालक मंडळांचा नेहमीच प्रयत्न असून शेतकऱ्यांची अडवणूक करून लूट करणाऱ्या कुठच्याच घटकाची हयगय केली जाणार नाही, अशी तंबी बाजार समितीचे सभापती बन्सीभाऊ आठरे व उपसभापती मंगलताई गर्जे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व अन्य बाबीत व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी, तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बाजार समितीची निर्मिती शेतकऱ्यांसाठी झाली आहे. शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊनच विद्यमान संचालक मंडळ कार्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळायला हवा यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्नशील असतो.

शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करून, तसेच संगणमत करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याबाबत यापूर्वीही तक्रारी आल्या होत्या. बाजार समितीच्या संचालक मंडळाने यावर गांभीर्याने विचारविनिमय करून व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन व्यवहार बंद ठेवले. शेतीमालाची खरेदी बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आला. शेतकरी एकसंघ नसल्याने व्यापाऱ्यांचे फावते असेही त्यांनी यावेळी सांगीतले. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून बाजार समितीने कायदेशीर मार्ग अवलंबिल्यास व्यापारी शेतीमालाची खरेदी बंद ठेवून शेतकऱ्यासह बाजार समितीलाही वेठीस धरत असल्याची अप्रत्यक्ष मात्र धक्कादायक कबुली पदाधिकाऱ्यांनीच दिली आहे. यावेळी तरी संचालक मंडळ काही ठोस निर्णय घेते, कागदी घोडे नाचवत शेतकऱ्यांची पिळवणूक उघड्या डोळ्यांनी पाहते हे पहावयास मिळणार आहे.

दरम्यान,बाजार समितीने भुसार व खरेदीदार व्यापाऱ्यांना बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र शासनाच्या 30 ऑगस्ट 2019 च्या निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2019 पासून शेतीमाल घेताना शेतकऱ्यांचा आधार कार्ड व बॅंक पासबुक झेरॉक्‍स घेऊन त्यांची रक्कम रोखीने न देता चेकने किंवा आरटीजीएसने देण्यात यावी. रोख पैसे देऊ नये, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची विक्री होणार नाही,याची दक्षता घ्यावी वरील सर्व बाबींची दखल घेतली नाही तर कृषी उत्पन्नाची खरेदी – विक्री नियमन अधिनियम आपणा विरुद्ध अनुज्ञप्ती फी बाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, या नोटिसावर बाजार समितीचे सचिव व सभापती ची स्वाक्षरी आहे.

हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करून फसवणूक होणे गंभीर बाब आहे. निबंधक कार्यालयामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. हमीभावापेक्षा कमी भावात शेतीमाल खरेदी होत असेल तसा पुरावा दिल्यास संबधितावर कारवाई करण्यात येईल.

नामदेव पाटील , तहसिलदार पाथर्डी.

शेतीमाल हमीभावाने खरेदी करावा तसेच व्यवहार पासदर्शक करावा अशा लेखी सूचना बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर कायदेशीर कार्यवाही करू.

दिलीप काटे , सचिव बाजार समिती. 

Tags: agricultureAgriculture Farmahamad nagar newsGuarantee

शिफारस केलेल्या बातम्या

शेतीमालाला हमीभाव आणि दिवसा 10 तास वीज द्या; राजू शेट्टी यांच्याकडे 57 ग्रामपंचायतीचा ठराव
कोल्हापूर

शेतीमालाला हमीभाव आणि दिवसा 10 तास वीज द्या; राजू शेट्टी यांच्याकडे 57 ग्रामपंचायतीचा ठराव

1 month ago
सेंद्रिय उत्पादनात देशात महाराष्ट्र दुसरा ;  शेतीची वाटचाल आश्वासक
महाराष्ट्र

सेंद्रिय उत्पादनात देशात महाराष्ट्र दुसरा ; शेतीची वाटचाल आश्वासक

2 months ago
पुणे : 66 हजार हेक्‍टर्स शेती धोक्‍यात
पुणे

पुणे : 66 हजार हेक्‍टर्स शेती धोक्‍यात

3 months ago
केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने सेंद्रिय शेतीला गती देणार – शरद पवार
latest-news

केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने सेंद्रिय शेतीला गती देणार – शरद पवार

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

मुख्यमंत्रीपद हिरवणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांनी पद व पक्ष दोन्ही काढून घेतले?

सरकार एकनाथ शिंदेंचं, रिमोट कंट्रोल आता देवेंद्र फडणवीसांकडे ?

आज फक्त एकनाथ शिंदेंचाच शपथविधी होणार; मात्र शपथविधीला…

Most Popular Today

Tags: agricultureAgriculture Farmahamad nagar newsGuarantee

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!