नवी दिल्ली – ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉन कंपनीने अॅमेझॉन पे सेवेद्वारे एक नवी योजना सादर केली आहे. त्यानुसार आता ग्राहकांना चक्क पाच रुपयांमध्ये सोने खरेदी करण्याची संधी निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य खरेदीदारांना तसेच लहानमोठ्या गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कंपनीने गोल्ड व्हॉल्ट ही नवी योजना उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने या योजनेसाठी सेफगोल्ड समूहाशी एक करारही केला आहे.
गोल्ड व्हॉल्ट योजनेनुसार खरेदीदारांना कमीतकमी पाच रुपयांचेही सोने खरेदी करता येणार आहे. अॅमेझॉनच्या या योजनेपूर्वी पेटीएम, फोनपे, गुगल पे, मोबिक्विक, ऍक्सिस बॅंकेच्या फ्रीचार्ज या डिजिटल माध्यमांद्वारे सोन्यात गुंतवणूक करता येत होती. या कंपन्यांना स्पर्धा म्हणून आता अॅमेझॉनही मैदानात उतरले आहे.