पॉस मशिनद्वारेच खतांची खरेदी करा : कृषी अधिकारी

नीरा – अनुदानित खतांची विक्री करण्यासाठी परवानाधारक खत विक्रेत्यांना पॉस मशीन देण्यात आल्या असून, परवानाधारक खत विक्रेत्याने खतांची विक्री पॉस मशीनद्वारे करणे बंधनकारक आहे. या मशीनद्वारे खत खरेदी करण्यासाठी स्वतः उपस्थित राहून आधारकार्ड नंबर द्यावा लागतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी खतांची खरेदी पॉस मशीनद्वारे करून जे बील निघेल तीच रक्कम दुकानदारास द्यावी, असे आवाहन पुरंदर तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी महेंद्र गिरमे यांनी केले आहे.

महेंद्र गिरमे म्हणाले की, विविध खतांवर शासनाच्या वतीने 25 ते 50 टक्‍के सबसिडी दिली जाते. अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणूनच ही व्यवस्था केली आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्यांना पॉस मशीनवर अंगठा देणे आवश्‍यक आहे. त्यानंतर मशीनमधून एक स्लिप बाहेर येईल. शेतकऱ्यांना स्लिपवर असणारी किंमत दुकानदाराला द्याव.

खतांचा काळाबाजार करणे, टंचाईच्या काळात ठराविक शेतकऱ्यांनाच पुरवठा होणे या बाबीही पॉस मशीनमुळे थांबणार आहेत. खत खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या आधारकार्डची ऑनलाइन पडताळणी होणार आहे. त्याच व्यक्तीने खत घेतल्याचा पुरावा म्हणून त्याचा अंगठाही घेतला जाणार आहे. खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. जे खत विक्रेते पॉस मशीनद्वारे खत विक्री करणार नाहीत, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)