नाफेड मार्फत काश्‍मिरीत सफरचंद खरेदी

नवी दिल्ली- जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर केंद्राने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता केंद्र सरकार नाफेड मार्फत तेथील शेतकऱ्यांकडून सफरचंदांची खरेदी करणार असून याची संपूर्ण प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत पार पाडली जाणार असल्याची माहिती संबंधीत आधिकाऱ्यांनी दिली आहे.

केंद्राने जम्मू काश्‍मीरचे कलम 370 हटवून त्याची दोन केंद्रशासीत प्रदेशात विभागणी केल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना फुटीतरतावादी आणि दहशतवाद्यांकडून त्यांचे उत्पादन बाजारात विक्रीस उपलब्ध करू दिले जात नव्हते त्या पार्श्‍वभुमीवर केंद्राने हा निर्णय घेतला असल्याचेही या अधिकाऱ्याने यावेळी सांगितले.

यावेळी त्याने पुढे सांगितले की, सरकार नाफेड मार्फत थेट शेतकऱ्यांशी संपर्क करेल आणि त्यांनी पिकवलेले सफरचंद खरेदी करेल. तसेच त्याचे सर्व पैसे सरकारमार्फत शेतकऱ्यांच्या बॅंक अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात येतील असेही त्याने यावेळी नमूद केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×