बिर्ला समुहाकडून अमेरीकेच्या ऍलेरीस कंपनीची खरेदी

मुंबई: बिर्ला समुहातील हिंदाल्को कंपनीने अमेरीकेतील ऍल्युमिनियम उत्पादक कंपनी ऍलेरिसला 2.6 अब्ज डॉलरला म्हणजे 14 अब्ज रुपयाला विकत घेतले आहे.

या अगोदर हिंदाल्को कंपनीने नोव्हेलीस 6 अब्ज डॉलरला विकत घेतले होते. आता नोव्हेलीस कंपनीच्या माध्यमातून ऍलेरीस विकत घेतली आहे. त्यामुळे आता हिंदाल्को कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऍल्युमिनियम उत्पादक कंपनी झाली आहे. या नव्या कंपनीचा वार्षीक महसूल 21 अब्ज डॉलरचा असेल तर उत्पादन क्षमता 4.7 दशलक्ष टनांची असणार असल्याचे हिंदाल्कोचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी सांगीतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता हिदाल्को विमानाच्या आणि वाहनांच्या सुट्या भागासाठी ऍल्युमिनियम बनऊ शकणार आहे. ही कंपनी खरेदी करण्यासाठी अगोदर चीनच्या झॉंगवॅंग कंपनीने प्रयत्न केले होते. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. आता नव्या कंपनीचा बिर्ला समुहातील महसूलातील वाटा 2 टक्‍क्‍यानी वाढून 22 टक्‍के होण्याची शक्‍यता असल्याचे बिर्ला यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)