लोणी काळभोर- निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारा मिशनचे चौथे सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या 66व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हवेली व पुरंदर तालुक्यातील विविध भागामध्ये 39 सरकारी रुग्णालयात स्वयंसेवकांनी स्वच्छतादूत म्हणून काम केले.
लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. डी. जे. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रुग्णालयामधील वॉर्डच्या बाहेरचे खुले क्षेत्र, पार्किंग क्षेत्र, तसेच इतर परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता अभियानामध्ये लोणी काळभोर, आव्हाळवाडी, मांजरी, ऊरूळी कांचन, वाघोली, हडपसर, सासवड, राजेवाडी, जेजुरी आदी ठिकाणी फाऊंडेशनच्या स्वयंसेवकानी स्वच्छता केली.