लवकरच लोणी काळभोर पर्यंत मेट्रो मार्ग वाढविणार – अमोल कोल्हे

पुणे – स्वारगेट ते हडपसर येथील हडपसर ऐवजी लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता. तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केली.

शुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात चालू असलेल्या विविधविकास कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

दरम्यान, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. आमोल कोल्हे, हडपसरचे आमदार चेतन तुपे, दिलीप मोहिते पाटील, विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित व इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.