बुलडाणा – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिलाय. पंकजा मुंडे यांची खदखद एका खासगी कार्यक्रमात पाहायला मिळाली. बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा पदाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या,’एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल, पण कुणासमोर हात पसरवून कुठल्या पदाची मागणी करण्याची माझी संस्कृती नाही’ असं म्हणत मुंडे यांनी पुन्हा एकदा पदाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या,”माझं विश्व, माझे माता पिता, माझे कुटुंब तुम्ही सर्वजण आहात. तुम्हाला मी दहा परिक्रमा करेल, पण अजून कुठल्याही परिक्रमेची मला आवश्कता वाटत नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल, पण कुणासमोर हात पसरवून कुठल्या पदाची मागणी करण्याची माझी संस्कृती नाही’ असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.