शास्त्रज्ञांचे अभिनंदन ! परंतु नरेंद्र मोदींनी याची घोषणा कशी केली ? – पृथ्वीराज चव्हाण 

मुंबई: आज देशभरात भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन होण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जोरदार अभिनंदन होत आहे. मात्र यावर विरोधकांनी तीव्र शब्दात आक्षेप नोंदविला आहे. आज नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर देशवासीयांना महत्वाचा संदेश देण्याचे जाहीर केले. आणि त्यानंतर “भारतीय वैज्ञांनिकानी अंतरिक्ष क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी आज अँटीसॅटेलाईट मिसाईल (A-SAT) यशस्वीपणे लाँच केले आहे. अशा प्रकारची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे” अशी माहिती त्यांनी माध्यमांव्दारे दिली. मात्र नरेंद्र मोदी शास्त्रज्ञांचे श्रेय लुटत असल्याची टीका होत आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोदींवर टीका केली. ‘मिशन शक्ती’ची सुरवात युपीए सरकारच्या काळात झाली. हे मिसाईल २०१२ मध्ये तयार करण्यात आले होते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ते समोर म्हणाले, मी अंतरिक्ष आयोगाचा ६ वर्ष सदस्य होते. आजची घटना ऐतिहासिक आहे. आणि यासाठी भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन करायलाच हवे. मात्र ही घोषणा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली आणि तेही नरेंद्र मोदींच्या तोंडून का? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.

#MissionShakti यात तुमचे योगदान काय? धनंजय मुंडेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

‘मिशन शक्ती’ : राज ठाकरेंकडून वैज्ञानिकांच अभिनंदन; तर नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

#MissionShakti वरून ‘राष्ट्रवादी-भाजपम’ध्ये ट्विटरवार

Leave A Reply

Your email address will not be published.