उद्योगपती लक्षमी मित्तल यांच्या भावास फसवणूकीप्रकरणी अटक

नवी दिल्ली : देशातील मोठे उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी मित्तल यांचे बंधू आणि उद्योगपती प्रमोद मित्तल यांना फसवणूक आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना बोसनिया येथून अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लुकावासच्या उत्तरपुर्व भागातील कोकिंग प्लांट जीआयकेआयएलच्या संबंधित हे प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे.

प्रमोद मित्तल हे जीआयकेआयएल 2003 पासून संचालकपद सांभाळत आहेत. या कंपनीत जवळपास 1 हजार कर्मचारी काम करतात. दरम्यान, कंपनीच्या सुपरवायझर बोर्डाचे एक सदस्य आणि जनरल मॅनेजर परमेश भट्टाचार्य यांनादेखील या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्‍तींवर जर आरोप सिद्ध झाले तर 45 दिवसांचा तुरूंगवास संबंधितांना भोगावा लागण्याची शक्‍यता सरकारी वकिलांनी व्यक्‍त केली आहे. प्रमोद मित्तल आणि अन्य लोकांवर तब्ल 19 कोटींच्या फसवणूकीचा आरोप आहे. दरम्यान, याच वर्षी लक्ष्मी मित्तल यांनी तब्बल 1600 कोटी देवून आपला भाऊ प्रमोद मित्तल यांना एका प्रकरणातून वाचवले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)