रामाच्या नावावर पैसे वसूलीचा धंदा, कॉंग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई – अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र करण्यात आलेले सर्व आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत फेटाळले आहेत. या मुद्यावरून आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर   घणाघाती टीका केली आहे.

 

सचिन सावंत  म्हणाले,’अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी जमीन संपादनाच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटातच १८.५ कोटी रुपयांना विकत घेऊन मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून लज्जाहिनतेने भाविकांच्या श्रद्धेशी चालवलेला हा खेळ आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रामाच्या नावावर लोकांच्या भावनेशी खेळून चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलेला आहे, काँग्रेस ने जानेवारी महिन्यात जनतेची लूट होऊ शकते हा दिलेला धोक्याचा इशारा योग्य ठरला आहे.’

हे ही वाचा –
▶ “सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”; भाजपची शिवसेनेवर टीका
▶ अयोध्येतील जमिनीचा घोटाळा उघडकीस; प्रियांका गांधींची राम मंदिर चळवळीतील नेत्यांवर जोरदार टीका
▶ राम जन्मभूमी कथित गैरव्यवहार प्रकरणाची उत्तर मिळावीत : संजय राऊत
▶ राममंदिर जमीन खरेदी भ्रष्टाचार प्रकरण! “आता मोहन भागवतांनी खुलासा करावा,”; संजय राऊतांचा संताप

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.