व्यवसायाचा मानबिंदू बारामती ट्रेड सेंटर

मध्यवर्ती ठिकाणी एकाच छताखाली शॉप्स, ऑफिसेस, हॉल उपलब्ध

बारामती शहरातील बांधकाम क्षेत्रात बारामती ट्रेड सेंटर हा दर्जेदार प्रकल्प साकारला जात आहे. व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील मोक्‍याच्या जागी आणि एसटी स्टॅंडपासून हाकेच्या अंतरावर बारामती ट्रेड सेंटरची उभारणी सुरू केली आहे. ग्राहक आणि व्यावसायिकांची सांगड घालत दोघांच्या गरजा पूर्ण करण्यात हा प्रकल्प यशस्वी ठरत आहेत. हा ट्रेड सेंटर व्यावसायिकांना उन्नतीकडे नेणारा मार्ग आहे. सुसज्ज ट्रेड सेंटर बारामतीचा मानबिंदू ठरला आहे.

एसटी स्टॅंडच्या पाठीमागे रिंग रोडलगत अनुचंद्र हॉस्पिटललगत व प्रशासकीय इमारतीच्या शेजारी “बारामती ट्रेड सेंटर’च्या भव्य कमर्शियल प्रोजेक्‍टमध्ये विविध व्यवसायासाठी शॉप्स, ऑफिसेस, हॉल उपलब्ध होणार आहेत. कोणताही व्यवसाय सुरू केला तरी हमखास यश येणार आहे.

कारण एसटी स्टॅंड, प्रशासकीय इमारत, गणेश भाजी मंडई, सर्व हॉस्पिटल्स्‌ अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. छोटे, मोठ्या व्यावसायिकांसाठी विविध आकारात दुकाने, सेमिनार, कोचिंग क्‍लासेस, हॉस्पिटल्स, क्‍लीनिक व मेडिकल, हॉल, बॅंका, पतसंस्था उपलब्ध आहेत. पार्किंगसाठी खास सोय केली आहे. स्ट्रेचर लिफ्ट, पॅसेंजर लिफ्ट, जनरेटर बॅकअप व प्रशस्त लॉन आदी सुविधा आहेत.

ग्राउंड फ्लोअर व चार मजल्यांमध्ये 500, 459, 381, 290, 351 स्केअवर फुटांचे विविध शॉप्स, ऑफिसेस, हॉल विक्रींसाठी उपलब्ध आहेत. हा प्रकल्प बारामतीच्या वैभवात भर घालणारा ठरला आहे. आपली गुंतवणूक भविष्यातील सर्वोत्तम गुंतवणूक ठरणार आहे, अशी माहिती देत एकवेळ बारामती ट्रेड सेंटरला भेट देण्याचे आवाहन निर्मिती ग्रुपच्या वतीने भगवान चौधर, हर्षवर्धन खाडे, श्रीजीत पवार व प्रमोद काटे यांनी केले आहे.

बारामती शहरात व्यावसायिक आणि ग्राहकांची सांगड घालून भव्य “बारामती ट्रेड सेंटर’ साकारले जात आहे. यापूर्वी गृहप्रकल्प उभारले आहेत. ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. हाच प्रतिसाद आमच्यासाठी उत्साह आणि उमेद वाढविणारा ठरला आहे. विविध व्यावसायिक पूरक घटकांना ऊर्जा देण्यासाठी ट्रेड सेंटरची निर्मिती सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पाठबळावर तसेच विश्‍वासावर आम्ही खरे उतरू.
– भगवान चौधर, निर्मिती ग्रुप, बारामती.

खास ऑफरची लयलूट
बारामती ट्रेड सेंटरमध्ये शॉप्स, ऑफिसेस, हॉल खरेदी करताना खास दिवाळीनिमित्त ग्राहकांना बुकिंग रकमेवर 10 टक्‍के सूट देण्यात येणार आहे. स्टॅम्प ड्युटीवर 3 टक्‍के सूट देण्यात येणार आहे. व्यावसायिकांसाठी भविष्याचा वेध घेणारे ट्रेड सेंटर हे बारामतीचा मानबिंदू ठरला आहे. यात व्यावसायिकांच्या अर्थकारणाला जोड दिली आहे. व्यावसायिकांचे अर्थकारण आणि ग्राहकांच्या गरजा एकाच छताखाली देण्यात यशोमार्गावर मार्गक्रमण सुरू केले आहे.

शब्दांकन प्रमोद ठोंबरे, बारामती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.