नगर – नगर पुणे महामार्गावर रेल्वे पुलावर नगरहून पुणेकडे जाणाऱ्या बस व ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 3 ठार तर 20 ते 22 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
याबाबत माहिती अशी की, जामखेड आगाराची बस नगरहून पुणेकडे चालले असता पुणे हुन नगरकडे येणारा ट्रक केडगाव येथील रेल्वे पुलावर समोरासमोर धडक झाली यात 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले तर तीन ते चार अत्यवस्थ असल्याचे समजते. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाकडून तसेच नागरिकांकडून जखमींना तातडीने प्रथम उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र अद्यापही जखमींची नावे समजली नाहीत.