लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

लखनऊ (उन्नाव ) – उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा महामार्गावर भरधाव बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने आज सकाळी 6 च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

भरधाव बस प्रवाशांना घेऊन दिल्लीहून बिहारला जात असताना लखनऊ-आग्रा महामार्गावरील देवखारी गावाजवळ अपघात झाला आहे. बसमध्ये एकूण 24 प्रवासी होते. जखमीना ट्रामा सेंटर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.