#व्हिडीओ: मिडी बसमधुन धुर निघाल्याने खळबळ 

पुणे: पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या आणि चालु मार्गावर असलेल्या मिडी बसमधून अचानक मोठ्या प्रमाणात धूूर निघाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास लक्ष्मी रोडवर ही घटना घडली. ही गोष्ट तात्काळ प्रवासी आणि चालकाच्या लक्षात आली यामुळे होणारी दुर्घटना टळली.
बसमधुन धूर बाहेर येत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ गाडी थांबवण्यास सांगितले. यानंतर प्रवाशांकडूनच ही माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. दरम्यान, रेडीएटर गरम झाल्याने बसमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात धूर बाहेर आल्याचे अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे. मात्र, धूराचे प्रमाण जास्त असल्याने प्रवासी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली होती.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात गेल्या सहा महिन्यांपुर्वी दोनशे नव्या मिडीबस दाखल झाल्या आहेत. या अगोदर विविध कारणाने पीएमपीच्या बसेसने पेट घेतला आहे. मात्र, नव्याने दाखल झालेल्या बसेसमध्येही हा प्रकार घडल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही घटना समजताच पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)