केडगावकरांसाठी शुक्रवारपासून बससेवा

नव्या कोऱ्या ए. एम. टी. बस द्वारे दिली जाणार सेवा
नगर –
केडगावच्या नागरिकांसाठी आवश्‍यक असणारी ए. एम. टी. बस सेवा शुक्रवार पासून सुरू करण्यात येणार असून नागरिकांची होणाऱ्या गैरसोयीतून सुटका होणार आहे. दि.6 पासून तीन बसची सेवा सुरू होणार असल्याची माहिती दिपाकी ट्रान्सपोर्टचे संचालक शशीकांत गाडे यांनी दिली.

दर 15 मिनिटांनी ही बस सेवा मिळणार असल्याचे गाडे यांनी सांगितले तसेच भिंगारलाही बससेवा लवकरच सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. 5 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या बससेवे मुळे निंबळक, निर्मलनगर, इंजिनिअरींग कॉलेज यामार्गावर सुरू झालेली बससेवा आता केडगाव मध्येही सुरू होत आहे.

केडगावच्या शाहूनगर पासून ही सेवा सुरू होणार असून सात बसगाड्याद्वारे बससेवा सुरू होणार आहे. शाहूनगर ते बसस्थानकापासून निर्मलनगर अश्‍या सात गाड्यांच्या दिवसभरात एकुण 56 फेऱ्या होणार असल्याचेही गाडे यांनी सांगितले.

तसेच पंधरा दिवसानंतर भिंगारसाठीही दोन बसची सेवा सुरू करण्यात येणार असून या सेवे मुळे केडगाववासीयांबरोबरच भिग़ारकरांचाही वाहतुकीचा प्रश्‍न सुटणार आहे. नगर शहरात व्यवसाय ,नोकरी,शिक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून या नागरिकांना या बससेवेचा लाभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

केडगावसाठी बस सेवा सुरु करण्याची होती मागणी
नगर महापालिकेच्या सर्व भागात नवीन ए. एम. टी. बस सेवा सुरु झाल्या आहेत. परंतु केडगाव विभागासाठी बस सेवा सुरु झाली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

या भागात ए. एम. टी. तातडीने सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणवर नागरिकांनी एकत्र येवून ही बस सेवा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी केडगाव विभागात तातडीने ए. एम. टी. बस सेवा मनपाने सुरु करावी अशा आशयाचे निवेदन प्रभाग क्रमांक 16 मधील नगरसेविका सुनिता कोतकर यांनी नुकतेच दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.