पुणे – लोहगाव विमानतळावरून शहराच्या विविध ठिकाणी पीएमपीची बससेवा सुरू होती. मात्र, बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सेवा बंद केली आहे.
विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीतही बससेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. याआधी, कोथरुड ते विमानतळ व हिंजवडी ते विमानतळ या मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू केली होती. मात्र, या दोन्ही ठिकाणांहून विमानतळावर वेळेत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. तसेच, कोथरुड व हिंजवडी या ठिकाणांहून जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी असल्याने पीएमपीला आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.