इजिप्त : इजिप्तमध्ये दोन भीषण अपघातांमध्ये एकूण 28 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अनेक पर्यटकांचा समावेश असून त्यात एक भारतीय पर्यटकाचाही समावेश असल्याचं समजतंय.
याशिवाय 16 भारतीय पर्यटक जखमीही झालेत. सूझ शहरातील हॉस्पिटलमध्ये या पर्यटकांवर उपचार करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित भारतीय दूतावासाने सूझ शहर आणि कैरो येथील दोन संपर्क क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.
इजिप्तमध्ये पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यामध्ये 16 भारतीय पर्यटक जखमी झाल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले आहे.