लोणंद – लोणंद बाजारतळावरील कुसुम अशोक शेलार यांच्या घरातून अंधाराचा फायदा घेत सुमारे दीड वर्षापूर्वी दि. 5 जुलै 2021 रोजी सोन्याचे दागिने चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत लोणंद पोलीसांनी सुमारे साडेसात लाखांच्या चोरीचा ऐवज हस्तगत करत चोर आणि दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्यांना अटक करण्यात यश मिळविले.
पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, गुन्हे प्रकटीकरण विभागाने कौशल्यपूर्ण तपास करुन चोरी करणारा महेश किरण चव्हाण (वय 27, रा. जामदारमळा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) तसेच चोरीस गेलेला माल विकत घेणारे सोनार मंदार चंद्रकांत पारखी (वय 41, रा. शुक्रवार पेठ, सातारा), शाहरुख गुलामुर्तजा शेख (वय 30, रा. शनिवार पेठ सातारा), श्रीधर प्रकाश माने (वय 33, रा. राधिका रोड, सातारा) यांचा या गुन्ह्यातील असणारा सहभाग निष्पन्न करुन त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी 7,56,000 रुपये किंमतीचे सुमारे 21 तोळे सोने हस्तगत केले. या गंभीर गुन्याचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक