घरफोडी करणारे आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

नगर – भरदिवसा घरफोडी करणारे तीन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, पोना सुनील चव्हाण, संदीप पवार, भागीनाथ पंचमुख, सुरेश माळी, दीपक शिंदे, रवि सोनटक्के, रविंद्र कर्डिले, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बालिकाश्रम रोडवरील गायकवाड मळा येथे 1 लाख 32 हजार 500 रूपयांची घरफोडी झाल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दि. 26 मे रोजी दाखल झाला होता. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना आरोपी युवराज अर्जुन ढोणे (रा. रासकर गल्ली, मिजरगाव, ता. कर्जत) याने साथीदारांसह सदर गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने मिरजगाव येथे सापळा रचून ढोणेला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने जीवन नाना गिरगुणे, अविनाश अर्जुन ढोणे, अक्षय उर्फ आकाश बाजीराव गायकवाड (रा. श्रीरामनगर, मिरजगाव) यांच्याबरोबर घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचा मुद्देमाल प्रकाश सुभाष पाटील (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) याच्याकडे दिल्याचे सांगितले. अविनाश ढोणे, अक्षय उर्फ आकाश गायकवाड हे दोघे फरार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.