मुंबई – बर्गर किंग आयपीआच्या आयापीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता 9 डिसेंबर रोजी या आयपीओतील शेअरचे वितरण होणार आहे. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.
बर्गर किंग आयपीआला इतका प्रतिसाद का मिळाला हा चर्चेचा विषय झाला आहे. कंपनीने जेवढे शेअर विक्रीसाठी उपलब्ध केले होते त्यापेक्षा 156 पट मागणी आली आहे. 7.44 कोटी शेअर विक्रीला उपलब्ध असताना 11.67 कोटी शेअरसाठी मागणी आली आहे. त्यामुळे ज्या दिवशी या शेअरची लिंस्ट होईल त्या दिवशी या शेअरचे भाव वाढतील असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.
ज्यांना या कंपनीचे शेअर मिळतील त्यांच्यापुढे हे शहर कधी विकावेत हा मुद्दा असू शकतो. विश्लेषकांनी सांगितले की, कंपनीचे भारतातील कामकाज आणि विस्तार कार्यक्रम पाहता मध्यम ते दीर्घ पल्ल्यात परतावा बराच वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्यांना मध्यम ते दीर्घ पडल्यात शेअर बाळगायचे नाहीत अशाकरिता लिस्टिंगवेळी भाव वाढल्यानंतर नफा काढून घेण्याचा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
बोनांझा पोर्टफोलिओ या संस्थेचे संशोधन प्रमुख विशाल वाघ यांनी सांगितले की, नोंदणी वेळी शेअरच्या किमती जवळपास तीस टक्क्यांनी वाढू शकतात. बर्गर किंगच्या कामाचे स्वरूप पाहता आणि हा ब्रॅंड लोक ओळखत असल्यामुळे या वर्षी जारी करण्यात आलेल्या आयपीओपैकी आयपीओला दुसऱ्या क्रमांकाची पसंती गुंतवणूकदारांनी दिली आहे.
या अगोदर 144 कोटी रुपयांच्या माजगाव डॉक शिपबिल्डसच्या आयपीओला 157 पटीने अधिक प्रतिसाद मिळाला होता. हॅपियर माईंड या कंपनीच्या आयपीओला 150 पटीने प्रतिसाद मिळाला होता. भारतात लॉकडाउनच्या काळातही बरेच आयपीओ जारी करण्यात आले. या वर्षी जारी करण्यात आलेला बर्गर किंग चा आयपीओ चौदावा आहे. त्याचबरोबर या महिन्यात 5 आपीओ जारी होण्याची शक्यता आहे.