अर्धवट जळालेल्या नोटांची बंडले आढळल्याने खळबळ

कोलकाता – दक्षिण कोलकात्यात कालीघाट भागात एकेठिकाणी आज अर्धवट जळालेल्या नोटांची बंडले आढळून आल्याने त्याविषयी मोठीच उत्सुकता निर्माण झाली आहेत. या नोटा चालू चलनातील आहेत आणि त्या 50 रू, 20 रू, आणि 10 रूच्या आहेत.

एका पोत्यात त्या नोटा भरून टाकून देण्यात आल्याचे दिसून आले आहे. लोकांनी त्या नोटांमधील बंडले काढून ती तपासली पण त्यातील एकही बंडल पुन्हा वापरण्याच्या लायकीचे राहिले नव्हते. ही बातमी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी या नोटा ताब्यात घेतल्या.

त्याची नेमकी किंमत किती आहे याचा अंदाज घेतला जात आहे.  आम्ही स्थानिक लोकांच्या मदतीने या नोटांच्या संबंधात माहिती मिळवत आहोत असे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.