पुणे – बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नॅशनल हॉटेल शेजारील पेट्रोल पंपाजवळ गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या बंडगार्डन पोलिसांनी आवळल्या आहेत. जितेंद्र अण्णासाहेब हावले (वय 32, रा. दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाबत विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीसनिरीक्षक प्रताप मानकर यांनी विशेष पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार गुरुवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तपास पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत नॅशनल हॉटेल शेजारील पेट्रोल पंपाजवळ एक व्यक्ती संशयीतरित्या थांबलेला असून त्याच्या कंबरेला पिस्टल आहे. अशी माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने त्याठिकाणी पाहणी केली. दरम्यान एक व्यक्ती संशयीतरित्या थांबलेलादिसून आल्याने त्यास सापळा रचून पोलिसांनी जेरबंद केले. यावेळी त्याची जागीच अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक देशी बनावटीचा पिस्तूल व 5 जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्याविरोधातबंडगार्डन पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- … यांनी केली कामगिरी
वरील कारवाई पश्चिम विभाग अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, मा. सागर पाटील,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 02, श्री. आर. एन. राजे, सपोआ लष्कर विभाग, पुणे, श्री. प्रताप मानकर, वरिष्ठपोलीस निरीक्षक व श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे), बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे यांचेमार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. राहुल पवार, पोलीस उप निरीक्षक, सहा. पो. फौज मोहनकाळे व तपास पथकातील स्टाफ प्रताप गायकवाड, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, हरिष मोरे, अनिलकुसाळकर, संजय वणवे, किरण तळेकर, सागर घोरपडे, शिवाजी सरक, ज्ञाना बडे, मनोज भोकरे व सतिश मुंडेयांनी केली.