Raja Shivaji Box Office : बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॅाक्स अॅाफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळेल असा अंदाज बांधण्यात आला होता. याशिवाय या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा रितेश देशमुख साकारताना दिसणार असल्याने या व्यक्तिरेखेत तो सूट होत नाही असा दावा करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटा ठरला असून चित्रपटाचे आणि रितेशच्या अभिनयाचे भरभरून कौतुक होत आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॅाक्स अॅाफिसवर तब्बल 11.35 कोटींची कमाई केली. यामध्ये केवळ मराठी व्हर्जनमधूनच सुमारे 8 कोटी नेट कलेक्शन झालं आहे. (Raja Shivaji Box Office) खरंतर ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 5.14 कोटी ग्रॉस कमावत मोठा विक्रम चित्रपटाने रचला होता. त्यापैकी मराठी व्हर्जनमधूनच अंदाजे 3.60 कोटी नेट जमा झाले होते. त्यामुळे पहिल्या दिवसाची दमदार कमाई होणार हे आधीच स्पष्ट झालं होतं. आता विकेंटमध्ये चित्रपटाची कामगिरी निश्चितच मोठी असणार हे स्पष्ट झाले आहे. (Raja Shivaji Box Office) Raja Shivaji Box Office : बंपर ओपनिंग! ‘राजा शिवाजी’ने पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत मिळून 6 हजार पेक्षा जास्त शोजसह प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा मान ‘सैराट’ आणि ‘टाइमपास 2’ यांच्याकडे होता. मात्र, ‘राजा शिवाजी’ने या चित्रपटांच्या तुलनेत दुप्पट कमाई करत एक नवा रेकॉर्ड रचला आहे. तब्बल 100 कोटींच्या भव्य बजेटमध्ये बनलेला हा आतापर्यंतचा सर्वात महागडा मराठी चित्रपट आहे. याअगोदर ‘वेड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख याने केले होते. त्यानंतर अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारा राजा शिवाजी हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. चित्रपटात रितेशसोबतच जेनेलिया देशमुख (सईबाई), संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि सलमान खान (पाहुणा कलाकार – जीवा महाला) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. हेही वाचा : kajal side effects: दररोज काजळ लावता? डोळ्यांसाठी ठरू शकतात 5 मोठे धोके