नवी दिल्ली – सणासुदीच्या दिवसांमध्ये टीव्हीएस मोटर कंपनी मोठी ऑफर देत आहे. कंपनी झिरो फायनान्ससह कॅशबॅकची देखील योजना देत आहे.
बाय नाउ पे लेटर योजना –
या ऑफरअंतर्गत कोणत्याही डाऊन पेमेंटशिवाय ज्युपिटर स्कूटर घरी आणता येणार आहे. तसेच बॅंक ऑफ बडोदा किंवा आयसीआयसीआय बॅंकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळणार आहे.
2500 रूपयापेक्षा कमी ईएमआय –
ऑफर अधिक आकर्षक बनवण्यासाठी कंपनीने कमी ईएमआय चा पर्याय दिला आहे. दरमहा फक्त 2222 रूपयाच्या ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. तसेच पेटीएम द्वारे पेमेंट केल्यास 4500 रूपयांपर्यंत कॅशबॅकसुद्धा देण्यात येणार आहे.
टीव्हीएस स्कुटरची वैशिष्ट्ये-
या स्कूटरमध्ये युएसबी चार्जर, फ्रंट स्टोरेज स्पेस, टिंटेड वायजर असे नविन फिचर्स देण्यात आले आहेत. ज्यूपिटर क्लासिक मध्ये 110cc इंजिन देण्यात आले आहे. बीएस 4 व्हर्जनमध्ये हे इंजिन 7.9 बीएचपी पाॅवर आणि 8.4 एनएम पीक टाॅर्क जनरेट करते.