नगर – गुंतवणुकीवर दामदुप्पट रक्कम देण्याच्या नावाखाली गुंतवणुकदारांची 1 कोटी 27 लाखांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बडोदा येथील सनसाइन हायटेक इन्फ्राकॉन या गुंतवणूक कंपनीच्या संचालकांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या कंपनीचा एजंट म्हणून काम करणारे केडगाव येथील राजेंद्र काशिनाथ पाचपुते यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीचे चेअरमन रमेशचंद्र नायक, दिनेश नायक, परमानंद प्रजापती, दीपक गेहलोत, राकेश आर्य, दिनेश बुरीया, किसन मेरावत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 2012 ते 2017 या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
पाचपुते हे एचबीएन डेरीज अँड अलाइड या कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी एजंट म्हणून कार करत होते. त्या वेळी एचबीएनमध्ये काम करणारे किसन मेरावत (रा. राजस्थान) पाचपुते यांना भेटले होते. त्या वेळी मेरावत यांनी पाचपुते यांना सनसाइन या गुंतवणूक कंपनीची माहिती दिली होती.