जलसंधारणाच्या बुलढाणा पॅटर्नला मिळाली राष्ट्रीय मान्यता नीती आयोग करणार राष्ट्रीय धोरण

नागपुर, – महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जलसंधारणाच्या “बुलढाणा पॅटर्न’ला राष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे आणि निती आयोग यावर आधारित राष्ट्रीय धोरणाची आखणी करत असल्याच्या माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली आहे. महाराष्ट्र शासनाने जलसंवर्धनासाठी सदर पॅटर्नचा अवलंब करावा असे आवाहन गडकरी यांनी केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गडकरी यांनी म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच जलमार्ग नाले आणि नदी यांच्या खोलीकरणाच्या कामांमध्ये निघालेल्या मातीचा वापर करून राष्ट्रीय महामार्गचे बाधकाम आणि जलसंवर्धन यांच्या कामाचा समन्वय साधला गेला आहे. परिणामी बुलढाणा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणी साठवणुकीची क्षमता वाढली आणि हे बुलढाणा पॅटर्न म्हणून ओळखले जाऊ लागले. जलस्त्रोतांच्या खोलीकरणांच्या कामामध्ये वापरल्या गेली परिणामी राज्य सरकारला कुठलाही खर्च न होता सुमारे 22,500 टी.एम.सी. एवढी पाणीसाठवण क्षमतेत वाढ झाली, असे गडकरी यांनी नमुद केले आहे.

दरवर्षी नागपुरात आयोजित होणाऱ्या कृषी मेळावा “ग्रोव्हिजन’ च्या माध्यमातून सुद्धा गडकरी यांनी पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या क्षेत्रांना रस्ते निर्मितीच्या कामांमध्ये किफायतशीर “बुलढाणा पॅटर्नचा’ अवलंब करण्याचे आवाहन केले आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.