बुलढाणा : बुलढाणामधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये एका भाजप नेत्याने शहरातील पोलीस ठाण्यात एका महिलेला मारहाण केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या महिलेला मारहाण करण्याचे भाजप नेत्याचे नाव शिवा तायडे असे आहे. शिवा तायडे हे मलकापूर कृषी समितीचे अध्यक्ष आहेत.
भाजपचा स्थानिक पुढारी तथा मलकापूर जी बुलढाण्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती शिवा तायडे या गावगुंडाकडून शहरातील पोलीस स्टेशन मध्येच महिलेला मारहाण.
थोर ते गृहमंत्री.. थोर ते पोलीस कर्मचारी @Dev_Fadnavis @supriya_sule @AdvYashomatiINC @AUThackeray @ShivSenaUBT_ pic.twitter.com/CGAEEDl5zs— SushmaTai Andhare (@andharesushama) August 7, 2024
काय आहे व्हिडिओमध्ये?
सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक जोडपे एका बाकावर बसलेले दिसत आहे. तर, भाजप नेते तायडे हे महिलेला मारहाण करताना दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती करून तायडे यांना रोखले. त्यानंतर एक महिला देखील नेत्याला मारहाण करण्यापासून थांबवते. नेमके प्रकरण काय आहे, हे संबंधित दाम्पत्य आणि भाजप नेते पोलीस ठाण्यात का पोहोचले? हे अद्याप समोर आलेले नाही.
सुषमा अंधारेंनी शेअर केला व्हिडिओ
‘भाजपचा स्थानिक पुढारी आणि बुलढाण्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती शिवा तायडे या गावगुंडाकडून शहरातील पोलीस स्टेशन मध्येच महिलेला मारहाण, थोर ते गृहमंत्री…थोर ते पोलीस कर्मचारी.’ असे कॅप्शन देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या हा व्हिडिओ शेअर करताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.