“एमएडीसी’चे कार्यालय स्थापन झाल्याने विचारला जातोय प्रश्न
पुणे – पुरंदर येथील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी 7 गावांमधील 2 हजार 832 हेक्टर जागेच्या हद्दीची अधिसूचना शासनाकडून प्रसिद्ध केली आहे.
विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती शासनाने दिली आहे. त्यानुसार पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या 7 गावांमध्ये नमूद केलेल्या हद्दीमध्ये बांधकामे तसेच कुठल्याही प्रकारच्या विकास कामांसाठी शेतकऱ्यांना “एमएडीसी’च्या मुंबई येथील कार्यालयात अर्ज करावे लागत आहे. आता “एमएडीसी’चे कार्यालय पुण्यात स्थापन झाल्याने बांधकाम परवानगीसाठीचे अधिकार पुण्याच्या कार्यालयाला देण्यात येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
सध्या या 7 गावांमधील विमानतळाच्या हद्दीतील विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी तसेच विकास योजना करण्याचा उद्देशासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. विमानतळ प्रस्तावित असलेल्या 7 गावांमधील काही भाग हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) तर काही जिल्हाधिकारी यांच्या अख्यत्यारित येतो.