सिमला – हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात एक इमारत कोसळून त्या ढिगाऱ्या खाली 35 जण गाडले गेले आहेत. ही इमारत नहान-कुमारहट्टी रस्त्यावर आहे. त्यात खाली रेस्टॉरंट आणि निवासी खोल्या होत्या. या भागात पडत असलेल्या पावसामुळे आज ही इमारत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्या खाली जे लोक दबले गेले आहेत त्यात काहीं लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
घटनास्थळी मदत पथके पाठवण्यात आली असून पोलिस व अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासनाचेही अधिकारी ढिगारा हटवण्याच्या कामी गुंतले आहेत. हा ढिगारा पुर्ण उपसल्यानंतरच आत अडकलेल्यांविषयी माहिती सांगता येईल असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.